Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रकुर्ला रेल्वे स्थानकाबाहेर महागाईविरोधात काँग्रेसचे आंदोलन

कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेर महागाईविरोधात काँग्रेसचे आंदोलन

मुंबई – वाढत्या महागाई विरोधात आज मुंबईत विविध रेल्वे स्थानकांबाहेर मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या आदेशावरून आंदोलन करण्यात आले. कुर्ला रेल्वे स्थानकाच्या बाहेरदेखील काँग्रेस नगरसेवक अश्रफ आजमी यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

पेट्रोल, डिझेल, गॅस व इतर पेट्रोलजन्य पदार्थांवर अवाजवी कर व उपकर लादून मोदी सरकार जनतेची लूट करत असल्याच्या घोषणा आंदोलकांकडून करण्यात आल्या. आंदोलकांनी सर्व पेट्रोलजन्य पदार्थ जीएसटी अंतर्गत आणण्याची मागणी यावेळी केली. यावेळी आंदोलकांनी मोदी सरकारच्या ३ वर्षाच्या कालावधीत पेट्रोलचा वाढलेला दुप्पट भाव, पाकिस्तान, मलेशिया व भारतात किती प्रतिलिटरने पेट्रोल विकला जातो याचे फलकदेखील झळकवले.
सामान्य जनतेला खोटी आश्वासने देऊन मोदी सरकारने देशात सत्ता मिळवली आणि आता सामान्य जनतेला महागाई वाढवून त्रस्त केले आहे. या महागाईमुळे जनता पिचली आहे. जाती-धर्माचे वाईट राजकारण सध्या भारतात सुरू असून भारतीयांपर्यंत हे विषय पोहोचविण्यासाठी हे आंदोलन करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments