Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रकॅन्सरग्रस्तांना दिलासा, कूलिंग कॅपमुळे गळणारे केस रोखता येणार

कॅन्सरग्रस्तांना दिलासा, कूलिंग कॅपमुळे गळणारे केस रोखता येणार

मुंबई : कॅन्सरग्रस्तांसाठी आनंदाची बातमी आहे. अमेरिकेतील संशोधकांनी एका संशोधनाअंती स्कॅल्प कूलिंग कॅपची निर्मिती केली आहे. या कॅपमुळे कॅन्सरग्रस्त रुग्णांना केमोथेरपी आणि रेडिएशनमुळे जाणाऱ्या केसांचं प्रमाण बऱ्याच अंशी कमी होणार आहे.

कॅन्सरच्या उपचारांमध्ये प्रामुख्यानं केमोथेरपी आणि रेडिएशनचा पर्याय डॉक्टर अवलंबतात. हे उपचार प्रभावी असले तरीही त्यामुळे शरिरातील उष्णतेचं प्रमाण वाढतं. परिणामी त्यामुळे डोक्यावरील केसांचं गळण्याचं प्रमाण वाढतं. बहुतांश रुग्णांचे डोक्यावरचे सर्व केस या उपचारांमुळे निघून जातात.

कन्सरग्रस्तांसाठी सुरु असणाऱ्या दोन संशोधनांचा फेब्रुवारी १४ मध्येच जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल असोसिएशनमध्ये समावेश करण्यात आला आहे. सध्याच्या घडीला हे तंत्रज्ञान अमेरिकेत संशोधीत झालं असलं तरीही भारतात ते लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे. संशोधकांनी प्रदीर्घ संशोधनानंतर बनवलेल्या या कूलिंग कॅपमुळे कॅन्सरग्रस्त रुग्णांना मोठा फायदाच होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments