Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रकोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणातील दोषींना २९ ला सुनावणार शिक्षा

कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणातील दोषींना २९ ला सुनावणार शिक्षा

अहमदनगर : कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणातील दोषींनी अमानुष कृत्य केलेले असल्याने त्यांना फाशीची शिक्षाच योग्य राहील, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बुधवारी न्यायालयात केला. निकम यांनी १३ विशेष कारणे सांगत दोषींना फाशीची शिक्षा मिळावी, अशी मागणी केली. कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याच्या प्रकरणात सत्र न्यायालयाने तीन आरोपींना दोषी ठरवले आहे. या दोषींना काय शिक्षा द्यायची याबाबत न्यायालयात युक्तिवाद सुरू आहे. कोपर्डीखून व अत्याचार प्रकरणातील दोषींना २९ ला शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

सरकारी पक्षाच्यावतीने युक्तिवाद करतान निकम म्हणाले, ११ ते १३ जुलै २०१६ दरम्यान बलात्कार व हत्येचा कट दोषींनी रचला. ११ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता पीडित मुलगी व तिच्या मैत्रीणीला रस्त्यात अडविले. दोषी क्रमांक एक जितेंद्र शिंदे याने पीडित मुलीचा हात खेचला.  बलात्काराच्या उद्देशाने रस्त्याच्या कडेला नेले. दोषी नितीन भैलुमे व संतोष भवाळ हे त्यावेळी विकट हास्य करत जितेंद्र शिंदेच्या कृत्याचा आनंद लुटत होते. त्यावेळी दोघांनीही जितेंद्र शिंदेला नंतर काम उरकण्याचा सल्ला दिला. त्यानंतर दोन दिवस पीडितेवर जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे, संतोष भवाळ हे पाळत ठेवत होते. पीडित मुलगी १३ जुलैला सायंकाळी ७ वाजता पीडित मुलगी मसाला आणण्यासाठी जात होती.

पीडित मुलगी परत न आल्याने आई-वडिलांनी शोध घेतला. त्यावेळी रस्त्याच्या कडेला सायकल दिसली. त्यावेळी शेतातच मुलीचे प्रेत सापडले. मुलीचे हात निखळून पडले, गळा आवळून तिची हत्या करण्यात आली होती. दोषींनी नियोजनपूवर्क ही हत्या केली. यात जितेंद्र शिंदेला नितीन भैलुमे, संतोष भवाळ यांनी साथ दिली, असे सांगत निकम यांनी तिघांनाही फाशीची शिक्षाच योग्य राहील, असा युक्तिवाद केला. तिघेही आरोपी परिपक्व, वयाने तरुण आहेत. कृत्याची त्यांना जाणिव होती.

दोषी ठरविल्यानंतर त्यांना दु:ख नाही, दोषींचे वक्तव्य उद्धटपणाचे, त्यांना या कृत्याचा पश्चातापही नाही़ कमी शिक्षा दिली तर ते चांगले राहू शकतात की नाही, याची शंका आहे. आरोपी मानसिक तणावाखाली होते, असेही नाही, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील निकम यांनी केला. दोषी संतोष भवाळ याच्या वतीने अ‍ॅड. बाळासाहेब खोपडे यांनी युक्तिवाद केला. निकम यांनी युक्तिवाद करताना १३ कारणे सांगितली. त्यास दोषींचे वकील बाळासाहेब खोपडे यांनी आक्षेप घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments