Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रगार पिटीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा- कृषीमंत्री

गार पिटीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा- कृषीमंत्री

मुंबई: राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्याचा काही भाग आणि धुळे भागात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गारपिटीमुळे शेतीच्या नुकसानीचे पंचनामे कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने करावेत. जिल्हा प्रशासनाने उद्या विमा कंपन्यांची बैठक घेऊन गावनिहाय आकडेवारी त्यांना उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिले.

राज्यातील ज्याभागात रविवारी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली त्याचा आढावा कृषीमंत्र्यांनी घेतला. त्यांनी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विजयकुमार यांच्याशी दूरध्वनीवरून राज्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाबाबत चर्चा केली.

ज्या गावांमध्ये गारपीट व अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामाच्या उभ्या पिकाचे तसेच काढणी पश्चात मळणीसाठी ठेवलेल्या धान्याचे नुकसान झाले आहे त्याबाबत विमा कंपन्यांना तातडीने माहिती कळवावी. यासाठी जिल्हाधिकारी, कृषी अधिकाऱ्यांनी उद्या संबंधीत विमा कंपन्यांची बैठक घ्यावी व त्यांना झालेल्या नुकसानाबाबत गावनिहाय शेतकऱ्यांची माहिती द्यावी. त्याचबरोबर पुढील दोन ते तीन दिवसातील माहितीही इमेल द्वारे देण्याची व्यवस्था करावी जेणेकरून संबंधित विमा कंपनीला बाधित शेतकऱ्यांची आकडेवारी उपलब्ध करून देत येईल.

स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे तलाठी, ग्रामसेवक, सहायक कृषी अधिकारी यांनी देखील पंचनामे जिल्हा प्रशासनाला सादर करून मदतीबाबत प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाकडे सादर करावा, अशा सुचना कृषीमंत्र्यांनी प्रशासनाला केल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments