Placeholder canvas
Tuesday, April 23, 2024
Homeपश्चिम महाराष्‍ट्रपुणेडीएसके ठणठणाट; डॉक्टरांचा अहवाल!

डीएसके ठणठणाट; डॉक्टरांचा अहवाल!

पुणे: गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आलेले पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांची प्रकृती स्थिर असल्याचा अहवाल ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिला आहे. पोलीस आता त्यांची चौकशी करू शकतात,’ असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. यामुळे डी.एस.कुलकर्णी यांना चौकशीला सामोरं जाव लागणार आहे.

तुरुंगात जाण्याची नामुष्की आल्यानं मानसिक धक्का बसलेले डीएसके पहिल्याच रात्री भोवळ येऊन पडले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डीएसकेंची प्रकृती खालावली असून त्यांना अॅडमिट करण्याची गरज असल्याचा अहवाल दोन दिवसांपूर्वी ससून रुग्णालयाच्या मेडिकल बोर्डानं दिला होता. त्यानुसार त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळी पुन्हा त्यांना तपासणीसाठी ससून रुग्णालयात आणण्यात आलं. तिथं त्यांची तपासणी झाली. तपासणीनंतर ते पूर्णपणे बरे असल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला. त्यामुळं आता डीएसकेंना पुन्हा पोलिसांच्या ताब्यात दिलं जाईल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. यामुळे पोलिसांना डीएसके कडून जो काही जबाब घ्यायचा जो पुढील तपास करायचा तो घेण्यासाठी अडचण जाणार नाही. यामुळे डीएसकेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments