Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रतीन वाहनांच्या भीषण अपघातात पाच तरूण ठार

तीन वाहनांच्या भीषण अपघातात पाच तरूण ठार

१.बेलापूर-श्रीरामपूर रस्त्यावर बेलापूर खुर्दजवळ अपघात २. बेलापूर खुर्द येथे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार उलटून समोरुन येणाऱ्या टँकरवर आदळली


अहमदनगर: बेलापूर-श्रीरामपूर रस्त्यावर बेलापूर खुर्दजवळ बुधवारी रात्री सव्वा बारा वाजता तीन वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात पाच तरुणांचा जागीच मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. शिवा ढोकचौळे (वय २७), नितीन सोनवणे (वय २७, दोघेही रा. रांजणखोल, ता. राहाता), सुभाष शिंदे (वय ३०, ब्राह्मणगाव वेताळ, ता. श्रीरामपूर), सचिन तुपे (वय २८), भारत मापारी (वय २७, दोघेही रा. भैरवनाथनगर, ता. श्रीरामपूर) अशी मृतांची नावे आहेत. तर पीयूष पांडे (रा. भैरवनाथनगर) हा या अपघातात जखमी झाला आहे.

हे सर्वजण स्विफ्ट कारमधून (एमएच १७ एसी ९००९) पार्टीसाठी देवळाली प्रवरा येथे गेले होते. तेथून परतत असताना बेलापूर खुर्द येथे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार उलटून समोरुन येणाऱ्या टँकरवर (एमएच ०४ आर ९६६६) आदळली. त्याचवेळी भरधाव वेगाने येणारी इंडिका कारही (एमएच १७ ६०५५) या कारवर येऊन आदळली. यात स्विफ्ट कारमधील पाच जण जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाला. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments