Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रदलित समाजाच्या तरुणांच्या अटकसत्राचा काँग्रेसकडून निषेध

दलित समाजाच्या तरुणांच्या अटकसत्राचा काँग्रेसकडून निषेध

मुंबई: भीमा कोरेगावच्या घटनेनंतर पोलिसांकडून कोंबिग ऑपरेशन सुरु असून अनेक तरूण, महिला, अल्पवयीन मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना विनाचौकशी, रात्री अपरात्री घरात घुसून अटक करण्यात येत आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी या कारवाईचा आणि अटकसत्राचा तीव्र शब्दात जाहीर निषेध करित असून सदर अन्यायी कारवाई तात्काळ थांबवावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रदेश कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

आतापर्यंत विविध ठिकाणाहून दलित समाजाच्या हजारो लोकांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत ते मिलिंद एकबोटे आणि मनोहर भिडे हे मात्र मोकाट आहेत. मनुवादी विचारधारेच्या सरकारच्या इशा-यावर पोलीस कारवाई करत आहेत अशी भावना दलित समाजात निर्माण झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments