Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रदहावी-बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर

दहावी-बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर

मुंबई : राज्यातील दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचं फेब्रुवारी-मार्च २०१८ मधील वेळापत्रक जाहीर झालं आहे. दहावीची परीक्षा मार्च २०१८ ते २४ मार्च २०१८ दरम्यान, तर बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०१८ ते २० मार्च २०१८ दरम्यान होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने वेळापत्रक जाहीर केला.

फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मुंबई, कोकण, कोल्हापूर, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक आणि लातूर या नऊ केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे.

दहावी-बारावीची परीक्षा कधी?

– बारावीची परीक्षा –२१ फेब्रुवारी ते २० मार्च २०१८

– दहावीची परीक्षा – १ मार्च ते २४ मार्च २०१८

परीक्षेचं वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलं असलं, तरी छापील स्वरुपात प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पाठवण्यात येणार आहे.

प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि इतर विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळातर्फे शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना कळवण्यात येणार आहे.

दरम्यान, राज्य शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळाव्यतिरिक्त इतर संकेतस्थळ किंवा व्हॉट्सअॅपवरुन फॉरवर्ड होणाऱ्या वेळापत्रकांवर विश्वास ठेवू नये, असेही शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.

 परीक्षेचं संपूर्ण वेळापत्रक महाराष्ट्र बोर्डच्या अधिकृत www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाहीर

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments