Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeपश्चिम महाराष्‍ट्रपुणेनितीन आगेच्या न्यायासाठी धडकणार मंत्रालयावर मोर्चा

नितीन आगेच्या न्यायासाठी धडकणार मंत्रालयावर मोर्चा

महत्वाचे
१.२५ जानेवारी रोजी मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्याचा बैठकीत निर्णय  घेण्यात २.मुंबई येथे १७ डिसेंबरला  मोर्चाच्या नियोजनाकरता राज्यव्यापी बैठक ३. खटल्याची फेरतपासणी आणि सुनावणीची मागणी


पुणे – नितीन आगे हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी तसेच ऑनर किलिंग आणि जातीय धार्मिक हिंसाचाराच्या घटनांतील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी विविध सामाजिक संघटनांच्या वतीने मंत्रालयावर २५ जानेवारी रोजी धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.

शासकीय विश्रामगृहावर ज्येष्ठ नेते डॉ. भारत पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी विचारवंत डॉ. गेल ऑम्वेट यांच्यासह रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे, सुवर्णा डंबाळे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय गणतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला २५ जानेवारी रोजी मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. मोर्चाच्या नियोजनाकरता राज्यव्यापी बैठक १७ डिसेंबरला मुंबई येथे घेण्यात येणार आहे.
‘या’ आहेत प्रमुख मागण्या-
नितीन आगे हत्या प्रकरणात ‘अॅट्रॉसिटी अॅक्ट’मधील तरतुदीनुसार विशेष न्यायालयाची स्थापना तसेच विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती न केल्यामुळे प्रकरणाची जबाबदारी स्वीवकारुन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी आंदोलकांची मागणी आहे. तसेच या खटल्याची फेरतपासणी आणि सुनावणी व्हावी आदी मागण्या या मोर्चाद्वारे करण्यात येणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments