Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रन्यायधीश लोया प्रकरण:'हू किल्ड लोया',पत्रके वाटणाऱ्यांना अटक!

न्यायधीश लोया प्रकरण:’हू किल्ड लोया’,पत्रके वाटणाऱ्यांना अटक!

मुंबई – ‘हू किल्ड लोया’ नावाचे टीशर्ट परिधान करून जस्टीस लोया यांच्या संशयास्पद मृत्यू संदर्भात मुंबई उच्च न्यायालयासमोर मूक आंदोलन करण्यात आले. हे आंदोलक कोण आहेत, याची माहिती मिळालेली नाही. त्यांनी ‘हू किल्ड लोया’, नावाचे पत्रकेही त्याठिकाणी वाटप केले.

आंदोलन करणाऱ्या सात जणांना आजाद मैदान पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. न्यायाधीश ब्रिजगोपाल हरिकृष्ण लोया हे सोहराबुद्दीन खटल्यातील न्यायाधीश होते. त्यांच्या मृत्यूनंतर बराच विवाद उभा राहिला होता, ज्याला अनुसरून आज मुंबई उच्च न्यायालयात हे मूक आंदोलन करण्यात आले. आंदोलक आणि मुंबई वकील मंडळाची काही संबंध आहे का याची चौकशी पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments