Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रबेपत्ता एपीआय बिद्रे प्रकरणी धरपकड सत्र!

बेपत्ता एपीआय बिद्रे प्रकरणी धरपकड सत्र!

मुंबई: कोल्हापूरच्या बेपत्ता महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे प्रकरणात मुंबई पोलिसांनी वेगाने पावलं टाकली आहेत. याप्रकरणी तिसऱ्या आरोपीला ताब्यात घेतलं आहे. कळंबोली,जळगाव,कुपवाडा अशा तीन ठिकाणांहून आरोपींना ताब्यात घेऊन पोलिस विचारपुस करत आहेत.

सांगलीच्या कुपवाडमधून एका व्यापाऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. तर याच प्रकरणात राजेश पाटील नावाच्या इसमाला कळंबोली पोलिसांनी जळगावातून अटक केली. त्याला आज कोर्टात हजर करण्यात आलं. यापूर्वी सर्वात आधी अश्विनी बिद्रे यांचा प्रियकर पोलिस अधिकारी अभय कुरुंदकरला अटक करण्यात आली आहे.

अभय कुरुंदकर तीन वर्ष सांगली जिल्ह्यात कार्यरत असताना, त्याचा संपर्क एका व्यापाऱ्य़ाशी वारंवार आला. बिद्रे गायब होण्याआधी कुरुंदकरने राजेश पाटील आणि त्या व्यापाऱ्याला वारंवार फोन केल्याचं उघड झालं. त्यामुळे रविवारी रात्री कुपवाडाहून या व्यापाऱ्याला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं सूत्रांनी सांगितलंय. हा व्यापारी कुरुंदकरचे आर्थिक व्यवहार पाहत असल्याची चर्चा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments