Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रभिडे आणि एकबोटेंच्या बचावासाठी छात्र भारतीच्या विद्यार्थ्यांना अटक - नवाब मलिक

भिडे आणि एकबोटेंच्या बचावासाठी छात्र भारतीच्या विद्यार्थ्यांना अटक – नवाब मलिक

मुंबई – भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगली संदर्भात संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असतानाही त्यांना अटक होत नाही. या आरोपींचा बचाव करण्यासाठी सरकार छात्र भारतीच्या विद्यार्थ्यांना अटक करून लोकांचे लक्ष्य वळवत असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

मुंबईच्या विलेपार्ले येथे गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी आणि जेएनयुचे विद्यार्थी नेते उमर खालिद यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र ऐनवेळी पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारून तिथे विद्यार्थ्यांना अटक केली. यावर मलिक यांनी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.
यासंदर्भात ईनाडूशी बोलताना मलिक म्हणाले, की भीमा कोरेगाव येथील दंगल आणि महाराष्ट्र बंदला मिळालेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे सरकार हादरले आहे. आपले अपयश झाकण्यासाठी छात्र भारतीच्या विद्यार्थ्यांना अटक करण्यात येत आहे. बंद सभागृहात कार्यक्रम असताना तिथे जमावबंदी लागू करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. जनतेचा आवाज दाबण्याचा सरकारची ही भूमिका आहे, असेही मलिक यांनी म्हटले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments