Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रभीमा कोरेगाव प्रकरण: कर्नाटकात आज हुबळी-धारवाड बंद!

भीमा कोरेगाव प्रकरण: कर्नाटकात आज हुबळी-धारवाड बंद!

हुबळी – कोरेगाव-भीमा येथील दलितांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आज हुबळीतील चनम्मा सर्कल येथे विविध दलित संघटनांनी एकत्र येऊन निदर्शने केली. हुबळी, धारवाड व बेळगावातील चिक्कोडी या ठिकाणी बंद पुकारण्यात आला आहे. बंद दरम्यान आंदोलकांनी काही ठिकाणी पोलीस बॅरीकेड्स तसेच गाड्यांची तोडफोड केली. 

१ जानेवारीला कोरेगाव-भीमा येथे विजयदिवस साजरा करण्यासाठी जमलेल्या लाखो दलित बांधवांवर झालेल्या हल्ल्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले. या घटनेच्या निषेधार्थ भारिप बहुजन पक्षाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ३ जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली. या बंदला महाराष्ट्रभर उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला होता. आता या प्रकरणाचे पडसाद कर्नाटकातही पाहायला मिळत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments