Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रमनोरातील १५८ आमदार होणार बेघर!

मनोरातील १५८ आमदार होणार बेघर!

महत्वाचे…
१.मुंबईतील मनोरा आमदार निवास इमारत पाडणार २. एक फेब्रुवारीपासून कक्ष रिकामे करणार ३. मनोरा मध्ये १५८ आमदारांचे निवासस्थान


मुंबई-सध्याची मनोरा आमदार निवास ही इमारत पाडण्यात येणार आहे. या ठिकाणी नवीन आमदार निवास इमारत बांधण्यात येणार आहे. या नव्या इमारतीच्या बांधकामासाठी मनोरा पाडली जाणार आहे. त्यासाठी एक फेब्रुवारीपासून मनोरा आमदार निवास इमारतीमधील कक्ष रिकामे करण्यात येणार आहेत. या सर्व प्रकारामुळे मनोरा आमदार निवासातील आमदार नवीन इमारतीचे काम संपे पर्यंत बेघर राहतील.

आमदार निवास पुनर्बांधणीसंदर्भात उच्चाधिकार समितीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. आमदारांसाठी मुंबईत निवासाकरता नरिमन पॉईंटमधील मोकळ्या जागेत टोलेजंग मनोरा आमदार निवास बांधण्यात आले होते. यात १५८ आमदारांचे निवासस्थान आहे. प्रत्येक आमदाराला सुमारे ३०० चौरस फूटपेक्षा मोठ्या दोन सदनिका देण्यात आल्या आहेत. अवघ्या २५ वर्षात या मनोरा आमदार निवासामध्ये अनेक समस्या पुढे यायला सुरुवात झाली. प्लास्टर निघणे, स्वच्छतागृहातमध्ये पाणी गळती पासून अनेक समस्या पुढे आल्या. त्यातच इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्येही इमारत दुरुस्त करणे अवघड असल्याचेही समोर आले. त्यामुळे मनोरा आमदार निवास नव्याने बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments