Placeholder canvas
Thursday, April 18, 2024
Homeमहाराष्ट्रमानखुर्दमध्ये झोपडपट्टीत अग्नितांडव

मानखुर्दमध्ये झोपडपट्टीत अग्नितांडव

मुंब: मानखुर्द येथे मंडाला परिसरातील झोपडपट्टीला पहाटे ६ वाजता भीषण आग लागली होती. ती आग तब्बल चार तासानंतर आटोक्यात आणली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या २० गाड्या दाखल झाल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्नीशमन दलाला यश आले.

मंडाला परिसरात मोठी झोपडपट्टी आहे. येथील माया हॉटेल शेजारील एका दुकानात लाग लागली आणि पुढे पसरत गेली. सकाळी ६ च्या सुमारास आग लागली. परिसरात दाटीवाटीने झोपडपट्टी असल्याने अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यासाठी अडथळे निर्माण झाले. आगीचं स्वरुप भीषण असून अग्नीशमन दलाच्या तब्बल २० गाड्या आग विझवण्याचं काम केले. आग मोठ्या प्रमाणावर पसरत असल्याने परिसरात भीतीचं वातावरण होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments