Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईतील सिद्धिविनायक गणपती दर्शनाला पाच दिवस बंदी!

मुंबईतील सिद्धिविनायक गणपती दर्शनाला पाच दिवस बंदी!

मुंबई – मुंबईकरांचं आराध्य दैवत असलेल्या प्रभादेवी इथल्या सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन पाच दिवस बंद राहणार आहे. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आणि अभिनेते आदेश बांदेकर यांनी ही माहिती दिली आहे.

माघी गणेशोत्सवनिमित्त सिद्धिविनायकाच्या मूर्तीला सिंदूर लेपन करण्यात येणार आहे. त्यामुळे बुधवारपासून १० ते १४ जानेवारी पर्यंत भाविकांना सिद्धिविनायकाचे थेट दर्शन घेता येणार नाही. मात्र, यादरम्यान भाविकांना गणपतीच्या प्रतिमूर्तीचे दर्शन घेता येणार आहे. त्यानंतर सोमवारी १५ जानेवारीला गणेशमूर्तीचे पूजन आणि आरती झाल्यानंतर दुपारी १ वाजता भाविकांना नेहमीप्रमाणे गाभार्‍यातून दर्शन घेता येईल, असंही आदेश बांदेकर यांनी सांगितलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments