Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeविदर्भनागपूरमुख्यमंत्र्यांवरील आपला विश्वास उडाला, लवकरच राजीनामा देणार - भाजपा आमदार

मुख्यमंत्र्यांवरील आपला विश्वास उडाला, लवकरच राजीनामा देणार – भाजपा आमदार

चंद्रपूर: वेगळ्या विदर्भाबाबत आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं त्याचं उत्तर अद्याप मिळालं नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांवरील आपला विश्वास उडाला आहे. त्यामुळे योग्य वेळ येताच आपण आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं वक्तव्य  भाजपचे काटोलचे नाराज आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केलं आहे. आशिष देशमुख यांची विदर्भ आत्मबळ यात्राचंद्रपुरात पोहचली आहे. वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी भाजपला कोंडीत पकडून त्यांनी ही यात्रा सुरु केली आहे. 

विदर्भ राज्याच्या मागणीसाठी ७ जानेवारीपासून ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’ सुरू करण्यात आली आहे. या यात्रेच्या निमित्ताने बेरोजगार, शेतकरी, शेतमजुर आदींशी संवाद साधला जात आहे. विदर्भ विकासासाठी विदर्भ राज्याची निर्मिती होणे गरजेचे आहे. शिवसेना ही विदर्भ राज्य निर्मितीसाठी विरोध करीत असल्याने ती सरकारच्या गळ्याची हड्डी झाली होती. शिवसेनेने पुढील काळात स्वतंत्र निवडणूक लढण्याचे जाहीर केले आहे. याच संधीचे सोने विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी सरकारने केले पाहिजे. मागणीचा वेळीच विचार न झाल्यास आपण राजीनामाही देऊ, अशी माहिती आ. आशिष देशमुख यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments