Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्ररेल्वे स्थानकावर तरुणीचं चुंबन घेणाऱ्याला बेड्या!

रेल्वे स्थानकावर तरुणीचं चुंबन घेणाऱ्याला बेड्या!

turbhe,trubhe station,trubhe,railway station,navi mumbai,mumbai,maharashtra,girl molestedमहत्वाचे…
१.नवी मुंबईतील तुर्भे रेल्वे स्थानकावरील प्रकार
२.महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर
३.नरेश के जोशी आरोपी अटकेत


नवी मुंबई – महिला प्रवाशांना रेल्वेतील प्रवास हा दिवसेंदिवस धोकादायक बनत चालला आहे. तरुणीच्या हाताला काठी मारुन गंभीर दुखापत केल्याची घटना ताजी असतांना नवी मुंबईच्या तुर्भे रेल्वेस्थानकावर तरुणी सोबत चुंबन घेण्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकारामुळे महिला प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

नरेश के जोशी या विकृतानं भर स्थानकात या तरुणीचं जबरदस्तीनं चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. आरोपीला तरुणीनं हटकल्यानंतर त्यानं तिथून पळ काढला. या धक्कादायक घटनेचे सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आले आहे. दरम्यान, रेल्वे सुरक्षा दलाच्या सतर्क जवानांनी या विकृताच्या काही वेळातच मुसक्या आवळल्या. आरोपी हा ४३ वर्षांचा असल्याची माहिती समोर आली आहे.

तरुणीनं केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वाशी लोहमार्ग पोलिसांकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. आरोपीला वाशी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. २० वर्षांची असलेली तरुणी ही तुर्भे येथील रहिवासी असून ती गुरुवारी २२ फेब्रुवारी रोजी सकाळी घणसोलीच्या दिशेनं प्रवास करण्यासाठी स्थानकात लोकलची वाट पाहत उभी राहिली होती. यावेळी स्टेशनवर एका विकृतानं मागून तिला मिठी मारली आणि जबरदस्तीनं तिचं चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तरुणी घाबरली मात्र लगेचच तिनं स्वतःला सावरत या विकृताचा प्रतिकार केला. यानंतर काही झालं नाही असा आव आणत विकृतानं तिथून पळ काढला.

हा सर्व धक्कादायक प्रकार स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कंट्रोल रुममध्ये बसलेले आरपीएफचे कॉन्स्टेबल निलेश दळवी आणि राहुल कुमार यांनी हा प्रकार कॅमेऱ्यात पाहिला. यानंतर त्यांनी तातडीने प्लॅटफॉर्मवर धाव घेत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. या प्रकारामुळे महिला प्रवाशांमध्ये पुन्हा भीती निर्माण झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments