Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeकोंकणठाणेलोकल ट्रेनचा डबा जळून खाक!

लोकल ट्रेनचा डबा जळून खाक!

मुंबई ठाण्यात सायडिंगला थांबलेल्या लोकल ट्रेनला बुधवारी पहाटे आग लागली. या आगीत लोकलचा एक डबा जळून खाक झाला असून वेळीच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याने पुढील अनर्थ टळला. आगीत जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाचे चार बंब आणि पाण्याची दोन टँकरच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही.

बुधवारी पहाटे अडीचच्या सुमारास ठाणे स्टेशनजवळ सायडिंगला थांबलेल्या लोकल ट्रेनमध्ये आग लागली. लोकलच्या २०१० बी कोचला आग लागली होती. सुदैवाने लोकल ट्रेनमध्ये कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. आगीचे वृत्त समजताच रेल्वेचे पथक आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. वेळीच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याने आग पसरली नाही. आगीचे नेमके कारण अजून समजू शकलेले नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments