Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रवाहतूक पोलिसाला मारहाण प्रकरणी आ. बच्चू कडूंना एक वर्षांचा तुरुंगवास

वाहतूक पोलिसाला मारहाण प्रकरणी आ. बच्चू कडूंना एक वर्षांचा तुरुंगवास

अचलपूर वाहतूक पोलिसाला मारहाण आणि शिवीगाळ करणे आमदार बच्चू कडू यांना महागात पडले आहे. अचलपूरमधील न्यायालयाने आमदार बच्चू कडू यांना एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

आमदार बच्चू कडू आणि त्यांचे काही सहकारी २४ मार्च २०१६ रोजी परतवाडा येथील एस. टी. डेपो चौकातून जात होते. बस डेपोजवळ खासगी ट्रॅव्हल्सच्या बसेस उभ्या होत्या. यावरुन बच्चू कडू यांनी तिथे ड्यूटीवर असलेले वाहतूक पोलीस इंद्रजित चौधरी यांना जाब विचारला. अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याचा आरोप करत बच्चू कडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी इंद्रजित चौधरी यांना शिवीगाळ आणि मारहाण देखील केली. या प्रकरणी चौधरी यांनी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानातील कलम ३५३ (सरकारी कामात हस्तक्षेप), ३३२, १८६ अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणाची अचलपूरमधील न्यायालयात सुनावणी सुरु होती. बुधवारी न्यायालयाने बच्चू कडू यांना दोषी ठरवले. कडू यांनी एक वर्षांचा तुरुंगवास आणि ६०० रुपयांचा दंड देखील ठोठावला.

आ. कडू यांनी यापूर्वीही सरकारी अधिकाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे.अशा स्वरुपाच्या पहिल्याच खटल्यात कडू यांना शिक्षा झाल्याचे सांगितले जाते. न्यायालयाच्या निर्णयामुळे बच्चू कडू यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments