Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeविदर्भनागपूरविरोधक कर्जमाफीसाठी तिसऱ्या दिवशीही आक्रमक

विरोधक कर्जमाफीसाठी तिसऱ्या दिवशीही आक्रमक

नागपूर: हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केल्याचे दिसून आले. हे नव्हं माझं सरकारहा बॅनर हातात घेऊन आणि पायऱ्यांवर बसून सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीचे इतर दिग्गज नेतेही हजर होते. तसेच राधाकृष्ण विखे पाटील, सुनील तटकरे हे नेतेही या घोषणाबाजीत सहभागी झाले होते.  तर या सगळ्या विरोधकांना सरकारसोबत चर्चा करण्याचे आवाहन गिरीश बापट यांनी केले. जो प्रश्न मांडायचा आहे त्यावर चर्चा करा गोंधळ घालून काय होणार? असा प्रश्न यावेळी गिरीश बापट यांनी विचारला.

हिवाळी अधिवेशनाचा आजचा  तिसरा दिवस आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी विरोधक एकवटलेले दिसले. शेतकऱ्यांची कर्जमाफीच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली आहे असा आरोप यावेळी विरोधकांनी केला. या सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली असा आरोप विखे पाटील यांनी केला. विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी अशी मागणी केली. त्यानंतर सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यावर पुन्हा एकदा कर्जमाफीचा मुद्दा उचलून धरत विरोधक आक्रमक झाले. संपूर्ण कर्जमुक्ती आणि शेतकरी आत्महत्या या मुद्द्यावर विरोधकांचा गोंधळ वाढला त्यामुळे प्रश्नोत्तराच्या तासातच तीनवेळा कामकाज तहकूब करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments