Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रशहीद जवानाच्या मानवंदनेसाठी जाणाऱ्या जवानांना अपघात

शहीद जवानाच्या मानवंदनेसाठी जाणाऱ्या जवानांना अपघात

Army vehicle accident, army truck accidentबीड : चंदीगडमध्ये शहीद झालेले जवान मुरलीधर शिंदे यांना मानवंदना देण्यासाठी बीएसएफची गाडी अहमदनगरहून परळीला निघाली होती. बीड-परळी महामार्गावर बीएसएफ जवानांच्या गाडीला अपघात झाला. नऊ जवान जखमी झाले.

चंदीगडमध्ये शहीद झालेले जवान मुरलीधर शिंदे यांना मानवंदना देण्यासाठी बीएसएफची गाडी अहमदनगरहून परळीला निघाली होती. या गाडीत एकूण १५ जवान होते. तेलगावजवळ आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास त्यांच्या गाडीला अपघात झाला.

दिंद्रुड जवळ संगम फाट्यावर असताना गाडीचे ब्रेक फेल झाले.  अपघातात तीन जवान गंभीर जखमी झाले असून ६ जवान किरकोळ जखमी आहेत. जखमी जवानांना तातडीनं बीडच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments