Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रशिवबंधन'नंतर शिवसैनिकांसाठी 'वाघाची अंगठी'

शिवबंधन’नंतर शिवसैनिकांसाठी ‘वाघाची अंगठी’

मुंबई : शिवबंधनापाठोपाठ आता शिवसैनिकांना वाघाच्या अंगठीचं वाटप करण्यात आलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची उद्या मंगळवारी जयंती आहे, त्यापार्श्वभूमीवर या अंगठ्यांचं वाटप करण्यात आलं आहे.

शिवसेनेच्या कुलाबा विभागाच्यावतीने ससून बंदर येथे वाघाच्या मुखाची प्रतिकृती असलेल्या खास अंगठ्यांचं वाटप करण्यात आलं आहे. यावेळी खासदार अरविंद सावंत, विभागप्रमुख पांडूरंग सकपाळ आणि कृष्णा पवळे आदी मान्यवर उपस्थित होते. खासदार सावंत यांच्या हस्ते विभागातील सुमारे ८०० शिवसैनिकांना या अंगठ्यांचं वाटप करण्यात आलं.
२०१२ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं होतं. त्यानंतर पक्षाची पडझड होऊ नये आणि पक्षावर मजबूत पकड रहावी म्हणून २०१४ मध्ये सायनच्या सोमय्या मैदानावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांच्या मनगटावर शिवबंधन बांधले होते. त्यानंतर आज पुन्हा तीन वर्षानंतर शिवबंधनपाठोपाठ शिवसैनिकांना वाघाचं चित्र असलेल्या अंगठ्यांचं वाटप करण्यात आलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंगठ्यांचं वाटप करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे आगामी काळात शिवबंधनपाठोपाठ शिवसैनिकांच्या हातात वाघाची अंगठी दिसू लागणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments