Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रशेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारु – धनंजय मुंडे

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारु – धनंजय मुंडे

यवतमाळ: राज्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हल्लाबोल करत आहेच परंतु येत्या अधिवेशनामध्ये सुध्दा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हल्लाबोल करुन सरकारला जाब विचारणार असल्याची माहिती विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी यवतमाळमध्ये पत्रकार परिषदेमध्ये दिली.

धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सरकारच्या निर्णयावर आणि भूमिकेवर जोरदार टिका केली. त्यांनी यावेळी सीसीआयने सरकारला कॉटन सीडचा अहवाल दिला होता. त्यावेळी त्या अहवालामध्ये बोंडअळीचा प्रार्दुभाव होणार असे स्पष्ट केले होते. या अहवालावर सरकारला तात्काळ कार्यवाही करण्याबाबत सांगितले होते. परंतु याकडे मुख्यमंत्री,कृषीमंत्री यांनी याकडे वेळीच लक्ष दिले नसल्यामुळेच हे संकट शेतकऱ्यावर ओढावले असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. बोंडअळीच्या प्रार्दुभावामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये देण्याची मागणी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. परंतु या मागणीकडेही सरकार डोळेझाक करत आहे.

यवतमाळमध्ये किटकनाशकांमुळे २० शेतकऱ्यांचे बळी गेले.त्या घटनेचा सीबीआय तपास सुरु झाला आहे. परंतु यामध्ये शेतकरी मेला तरी चालेल परंतु उदयोजकांना सरकारला वाचवायचे आहे. म्हणून विषबाधा नसल्याचे सरकार सांगत आहे.मग विषबाधा नव्हती तर मग शेतकऱ्यांना मदत का केली. असा सवाल करतानाच शेतकऱ्यांची फसवणूक करु नये. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईपर्यंत गप्प बसणार नाही असेही धनंजय मुंडे यांनी सांगितले.

१६ डिसेंबरला नागपूर येथे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत बीटी बियाणांचं वाण यासह शेतकऱ्यांच्या सर्व विषयावर एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून या चर्चासत्राला राज्यातील सर्व शेतकरी आणि शास्त्रज्ञही उपस्थित राहणार आहेत अशीही माहिती धनंजय मुंडे यांनी यावेळी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments