Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रसंघटनेच्या वतीने बच्चू कडूंच्या लढ्याला सव्वा लाखांची मदत

संघटनेच्या वतीने बच्चू कडूंच्या लढ्याला सव्वा लाखांची मदत

बुलडाणा : पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण प्रकरणी न्यायालयाने आमदार बच्चू कडू यांना दोषी ठरवित सात महिन्यांच्या शिक्षेसह १२ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. सदर दंड भरण्याची जबाबदारी उचलत कडू यांच्या समर्थनार्थ पुढील न्यायालयीन लढाई लढण्यासाठी प्रहारचे जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहिते यांनी बुलढाणा जिल्हा प्रहारच्या वतीने लाख २० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. 

प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा अचलपूरचे आमदार बच्चु कडू हे गेल्या २५ वर्षांपासून गोरगरीबांसाठी लढत आहे. शेतकरी, शेतमजूर, अपंग व निराधारांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी अनेकदा आपल्या जिवाची बाजी लावली आहे. अशा लढवय्या नेत्याची आज राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला गरज आहे. कर्तव्यात कसुर करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोधात कडू यांनी उभारलेला लढा हा स्वतः साठी नव्हता तर सामान्य जनतेसाठी होता असे मोहिते यांचे म्हणणे आहे.

सर्वसामान्यांसाठी असलेल्या या लढ्यात त्यांना झालेली शिक्षा व दंड आम्ही भोगण्यास सदैव तयार आहे. मात्र भारातीय संविधानात तशी तरदूत नसल्याने त्यांच्या वाट्याला आलेला शिक्षेचा वाटा उचलण्यासाठी तसेच पुढील न्यायालयीन लढाई लढण्यासाठी बुलढाणा जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आम्ही १ लाख २० हजार रुपयांची मदत जाहीर केली असून २४ जानेवारी २०१८ रोजी सदर मदत रोख स्वरूपात मुबई येथे कडू यांना सुपूर्द करण्यात येणार आहे. तसेच सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी असलेल्या या लढ्यात प्रत्येकांनी आपापले योगदान द्यावे, असे आवाहनही मोहिते यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments