Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रसकाळ वृत्तपत्राच्या महिला कर्मचारीचा मांजामुळे गळा कापल्याने मृत्यू!

सकाळ वृत्तपत्राच्या महिला कर्मचारीचा मांजामुळे गळा कापल्याने मृत्यू!

पुणे: पंतगासाठी वापरण्यास बंदी असलेल्या चिनी मांजाने गळा कापला गेल्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेचा अखेर मृत्यू झाला. सुवर्णा मुजूमदार असे दुर्देवी महिलेचे नाव असून बुधवारी सांयकाळी सहाच्या सुमारास पुणे महापालिका भवनाकडे जाणाऱ्या शिवाजी पुलावरून दुचाकीवर घरी जात होत्या. त्यावेळी मांजा गळ्याभोवती गुंडाळून गळा कापल्यामुळे गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यानंतर त्यांना त्वरीत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यांचा उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला.

मुजुमदार या पुणे येथे सकाळ वृत्तपत्रात मार्केटींगमध्ये काम करत होत्या. मुजूमदार यांच्या दुर्देवी मृत्युमुळे हळहळ व्यक्त होत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून शहरात पतंग उडविण्यासाठी अत्यंत घातक ‘नायलॉन’चा चिनी मांजा सर्रास वापरला जात होता. सर्वोच्च न्यायालयाची बंदी असूनही शहरातील दुकानांमध्ये सर्रास हा मांजा विकला जात आहे. या मांजामुळे अनेक किरकोळ व गंभीर अपघात होत असल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र बंदी असतांना सुध्दा याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने मुजूमदार यांचा हकनाक बळी गेला. पोलिस प्रशासनाला आता तरी जाग येईल का असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित करण्यात येत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments