Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रसांवत हत्या प्रकरण : दोन आरोपींना १८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी!

सांवत हत्या प्रकरण : दोन आरोपींना १८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी!

मुंबई – कांदिवलीतील माजी नगरसेवक अशोक सांवत हत्या प्रकरणात कांदिवली पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी या दोन्ही आरोपीना मंगळवारी बोरिवली कोर्टात हजर केले असता कोर्टाने दोघांना १८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

गणेश जोगदंड आणि सोहेल दोधिया अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी मिळाल्यामुळे या आरोपींकडून सत्य बाहेर येण्याची दाट शक्यता असल्याचे वर्तवण्यात येत आहे. मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार असल्याचे समोर येत आहे.
कांदिवलीत रविवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान शिवसेना नेते आणि माजी नगरसेवक अशोक सांवत हे घरी जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. कांदिवलीतील ठाकुर कॉम्प्लेक्स येथे धारधार शस्त्राने अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला होता. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा नोंद केल्यावर काहींना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या प्रकरणाचा पुढील तपास कांदिवली पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments