Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रहंसराज अहिरची वादग्रस्त विधानावरुन कोलांटउडी

हंसराज अहिरची वादग्रस्त विधानावरुन कोलांटउडी

चंद्रपूर – लोकशाही शासन व्यवस्था व सभ्यतेवर विश्वास नसणा-या अशा प्रमुख शासकीय वैद्यकीय अधिका-याने नक्षलवादी व्हावे असे उपरोधिक विधान नाराजीच्या भावनेतून केले. अन्य डॉक्टरांच्या बाबतीत हे विधान नव्हते, त्याचा विपर्यास केला जाऊ नये, त्यात दुरूस्ती व्हावी अशी अपेक्षा केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी व्यक्त केली. अहीर यांच्यावर टीका होत असतांना कोलांटउडी घेतला.

सामान्य रूग्णालय परिसरातील सदर उद्घाटन कार्यक्रम असताना प्रमुख शासकीय वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित राहतात हा प्रकार दुर्दैवी वाटल्याने त्यांच्या बाबतीतच विधान केले, अन्य डॉक्टरांबाबतीत ते नव्हते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता अनुपस्थित असल्याचे मला कळले होते. त्यामुळे त्यांनाही उद्देशुन हे वक्तव्य नव्हते. ज्या कार्यक्रमास स्थानिक खासदार तथा केंद्रीय मंत्री, आमदार, महानगराच्या महापौर, उपमहापौर, वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर मंडळी, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित असताना, त्यांच्याच रूग्णालय परिसरात कार्यक्रम होत असताना मात्र जिल्हा शल्य चिकित्सकांसारखे प्रमुख जबाबदार शासकीय अधिकारी याप्रसंगी अनुपस्थित राहून मार्गदर्शन करणे टाळतात.  प्रधानमंत्र्यांच्या गोरगरीबांसाठी असलेल्या अशा महत्वाकांक्षी योजनेकडे पाठ फिरवितात याचे शल्य वाटल्याने लोकशाहीवर विश्वास नसलेल्या अशा जबाबदार शासकीय वैद्यकीय अधिका-याबाबत असे वक्तव्य करणे भाग पडल्याचे ते म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments