Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रहार्बरवर आज मध्यरात्रीपासून शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत ४८ तासाचा मेगाब्लॉक!

हार्बरवर आज मध्यरात्रीपासून शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत ४८ तासाचा मेगाब्लॉक!

महत्वाचे…
१.हार्बर मार्गावरील बेलापूर येथील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनच्या कामांसाठी आज मध्यरात्रीपासून ते शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत विशेष ब्लॉक
२. पाच दिवसापासून हार्बर मार्गावर प्रवाशांचे हाल
३. प्रवाशांच्या गैरसोईकडे रेल्वे,बेस्ट,एनएमटी,पनवेल बस प्रशासनाचे दुर्लक्ष


मुंबई : हार्बर रेल्वेमार्गाचं शुक्लकाष्ट पाच दिवसापासून सुरुच असून प्रवाशांचे हालच सुरुच आहे. हार्बर मार्गावरील बेलापूर येथील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनच्या कामांसाठी आज मध्यरात्रीपासून ते शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे हार्बर मार्गावर चालणाऱ्या ६०४ फेऱ्यांपैकी ३४ फेऱ्या रद्द केल्या आहेत. यामुळे मागील आठवड्याप्रमाणेच प्रवाशांना हाल सहन करावे लागणार आहेत.

मध्य रेल्वेने घेतलेल्या ४८ तासांच्या ब्लॉकमध्ये सकाळच्या ऐन गर्दीच्या वेळेस बेलापूरहून सुटणाऱ्या आठपैकी सात फेऱ्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीन तर एक लोकल वाशीहून सुटणार आहे. सायंकाळच्या वेळेस पाच लोकल पनवेलपर्यंतच चालविल्या जातील. एक लोकल वाशीपर्यंत चालेल आणि दोन लोकल रद्द करण्यात येतील. गर्दी नसतानाच्या कालावधीतील ६५ फेऱ्यांपैकी ३१ फेऱ्या रद्द केल्या जाणार असून, १८ फेऱ्या पनवेलपर्यंत चालविल्या जातील. ४ फेऱ्या नेरुळपर्यंत, १० फेऱ्या वाशी आणि दोन फेऱ्या मानखुर्दपर्यंत चालतील. या ब्लॉकचा ट्रान्सहार्बर रेल्वे सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही.

नेहमीच्या कामांमुळे आणि तांत्रिक अडथळ्यांमुळे प्रवाशांना ही हार्बर नेहमी रडवते असंच म्हणावं लागेल. रोजच्या कामांमुळे प्रवाशांचे आणि नोकरदार वर्गाचे खूप हाल होतात. त्यात आता पुन्हा दोन दिवस मेगाब्लॉक असल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments