Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रधावत्या टॅक्सीत बेशुद्ध चालकाने दहा जणांना उडवले

धावत्या टॅक्सीत बेशुद्ध चालकाने दहा जणांना उडवले

taxi accidentमुंबई : टॅक्सी चालवताना चालक अचानक बेशुद्ध झाल्याने भरधाव टॅक्सीने १० जणांना चिरडल्याची घटना घडली. जे. जे. उड्डाणपुलाखालील मक्का-मदिना हॉटेलजवळ ही घटना घडली. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेत टॅक्सी चालक रिजवान खान (२६), खालिद एहमद (३०), शकील मस्तान (३८), मोहमद आरिफ (२२), पशुपतीनाथ (४०) , अब्दुल शेख (५२), अब्बास मर्चंट (७५), वसीम खान (४३), इम्रान बोट (२७), शमीमबानो (६७) जखमी झालेल्या नागरिकांची नावं आहेत. जे. जे. उड्डाणपुलाखालून जाताना टॅक्सी चालक रिजवान खान अचानक बेशुद्ध झाला. यावेळी भरधाव वेगात असलेल्या टॅक्सीने रस्त्यावरील १० जणांना उडवले. या अपघातात टॅक्सी चालक किरकोळ जखमी झाला असून अन्य ९ जण जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी देखील अशाप्रकारे रिजवान बेशुद्ध झाल्याची घटना घडल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले आहे.

जे. जे. उड्डाणपुलाखालून जाताना टॅक्सी चालक रिजवान खान अचानक बेशुद्ध झाला. यावेळी भरधाव वेगात असलेल्या टॅक्सीने रस्त्यावरील १० जणांना उडवले. या अपघातात टॅक्सी चालक किरकोळ जखमी झाला असून अन्य ९ जण जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी देखील अशाप्रकारे रिजवान बेशुद्ध झाल्याची घटना घडल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले आहे.

या घटनेत टॅक्सी चालक रिजवान खान (२६), खालिद एहमद (३०), शकील मस्तान (३८), मोहमद आरिफ (२२), पशुपतीनाथ (४०) , अब्दुल शेख (५२), अब्बास मर्चंट (७५), वसीम खान (४३), इम्रान बोट (२७), शमीमबानो (६७) जखमी झाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments