पुण्यात १५० वर्ष जुनी वृक्षांची कत्तल!

- Advertisement -

पुणे:सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या  मेन गेटजवळ    (मुख्य प्रवेशद्वार)  असलेली सुमारे ५ ते ८  वडाची महाकाय वृक्ष  पालिका उद्यान  विभागाकडून  तोडण्यात आल्याने नागरिकांचा संताप  अनावर  झालाय.

पहाटेच्यावेळेस ही वृक्ष तोडण्यात आल्याचाच नागरिकांनी म्हटलंय. जवळजवळ ५० ते १५० वर्ष जुनी वृक्ष तोडण्यात आलेली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या  मेन गेट (मुख्य प्रवेशद्वार) ते औंध रस्ता ,जकात नाका परिसरातील एकूण ४३ वृक्षतोडीचा निर्णय घेण्यात आला होता.  वृक्ष प्राधिकरण समितीसमोर न आणताच  हा निर्णय घेतला गेल्याचा आरोप वृक्ष प्राधिकरण सदस्यांनी केलाय. त्यामुळे याप्रकरणी आता पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

- Advertisement -