Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रसिडको काढणार १५ हजार घरांची लॉटरी

सिडको काढणार १५ हजार घरांची लॉटरी

मुंबई: सिडकोसाठी नवी मुंबईत नवीन वर्षांत सर्वसामान्यांसाठी खुशखबर आहे. सिडको नवी मुंबईत तब्बल १५ हजार १५२ घरे येत्या एप्रिल महिन्यात लॉटरी काढणार आहे. या सर्व घरांचा ताबा सिडको २०१९ च्या डिसेंबर पर्यंत देणार आहे.

नवी मुंबईतील घणसोली, तळोजा, कळंबोली, द्रोणागिरी आणि खारघर या विभागात सिडको एकूण १५ हजार १५२ घरे उभारणार आहे. यामधील ८५०० घरे ही एकट्या तळोजा क्षेत्रात उभारली जाणार आहेत. सर्व घरे ही ३५० ते ४५० चौरस फुटांची असणार आहेत.  या सर्व घरांची किंमत १५ लाख ते २२ लाखांपर्यंत असणार आहे. तळोजातील ८५०० घरांपैकी ४० टक्के घरं पंतप्रधान आवास योजनेची असणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटांसाठी ही घरे उभारली जाणार आहेत. ही सर्व घरे प्री फॅब पद्धतीने उभारली जाणार आहेत. यापैकी तळोजा येथील ८ हजार ५०० घराच्या कामांना पुढील महिन्यात प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. सिडको पुढील ५ वर्षांत ५२ हजार ४७० घरांची लॉटरी काढणार आहे. जी पुढील १० वर्षात उभारली जाणार आहे. मात्र ही सर्व घरे सर्वसामान्य मध्यमवर्गीयांसाठी असणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments