Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात 60 टक्के मतदान!

राज्यात 60 टक्के मतदान!

Votersमुंबई : महाराष्ट्रातील 288 जागांसाठी आज मतदान झाले. महाराष्ट्रात 60 टक्के मतदारांनी मतदान केलं. राज्यात ३,२३७ उमेदवार रिंगणात होते. २४ ऑक्टोबर रोजी निकाल लागणार आहे.
राज्य विधानसभेच्या २८८ जागा तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान करण्यात आलं. राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार होते. राज्यात ९५,४७३ मुख्य तर १,१८८ सहाय्यक अशी एकूण ९६ हजार ६६१ मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. चार कोटी ६८ लाख ७५ हजार, ७५० पुरुष तर चार कोटी २८ लाख ४३ हजार ६३५ असे एकूण आठ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार होते. यावेळी दोन हजार ६३४ तृतीयपंथी, तीन लाख ९६ हजार अपंग आणि एक लाख १७ हजार ५८१ सर्व्हिस मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. आता सर्वांना निकालाची प्रतिक्षा लागली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments