जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर रेतीचा ट्रक उलटल्यानं ६ गाड्यांचं नुकसान

- Advertisement -

महत्वाचे…

१.जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. २.रेतीने भरलेला ट्रक जोगेश्वरी लिंक रोड मार्गे प्रवास करत असताना चालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटले ३. ट्रक दुभाजकावर चढ़ून उलटला व विचित्र अपघात झाला


मुंबई : जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. रेतीने भरलेला ट्रक जोगेश्वरी लिंक रोड मार्गे प्रवास करत असतानाचालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि ट्रक दुभाजकावर चढ़ून उलटला व विचित्र अपघात झाला. या घटनेत पाच ते सहा कारचे नुकसान झाले. बुधवारी सकाळी .३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. विचित्र अपघात झाल्यानं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होते. दरम्यान सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती समोर आली आहे. सिप्झ गेट क्रमांक तीन समोरील ही दुर्घटना घडली आहे. दरम्यान, या घटनेत चार ते पाच जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

- Advertisement -
- Advertisement -