Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeपश्चिम महाराष्‍ट्रपुणेदुचाकीच्या धडकेने ३० वर्षीय महिला ठार

दुचाकीच्या धडकेने ३० वर्षीय महिला ठार

पिंपरी चिंचवड   पिंपरीत काळेवाडी या ठिकाणी रस्ता ओलांडताना मंगल तुपे या तीस वर्षीय महिलेला दुचाकी क्रमांक (जी. जे. ०१ एल. के. ५२०७) ने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की त्यामुळे तुपे यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागला आणि त्या जागीच ठार झाल्या.

या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. तसेच याप्रकरणी वाकड पोलीस पुढचा तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काळेवाडी या ठिकाणी रस्ता ओलांडताना तुपे यांना दुचाकी क्रमांक जी. जे. ०१ एल. के. ५२०७ ने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की त्यामुळे तुपे यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागला आणि जागीच त्या ठार झाल्या. तुपे कामावरून घरी चालल्या होत्या. याप्रकरणी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. तुपे धुणी-भांडी करण्याचे काम करत होत्या. तुपे त्यांच्या पतीसह थेरगाव संभाजी नगर भागात वास्तव्य करत होत्या. त्यांचा पती खासगी कंपनीत कामाला आहे. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक घोळवे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments