सावधान: महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात येणाऱ्यांना एका आठवड्याचे विलगीकरण सक्तीचे

- Advertisement -
a-week-long-quarantine-for-travelers-coming-to-mp-from-maharashtra
a-week-long-quarantine-for-travelers-coming-to-mp-from-maharashtra

भोपाल: महाराष्ट्रात कोविड रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणता वाढ होत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेश सरकारने महत्वाचे पाऊल उचलले आहे. मध्य प्रदेश सरकारने कोविड प्रतिबंधासाठी नवीन दिशानिर्देश जारी केले आहेत. यामध्ये महाराष्ट्राच्या सीमारेषेजवळील जिल्ह्यांना शेजारच्या राज्यातून येणाऱ्यांची माहिती देण्याबाबतचे आदेश दिले आहेत त्याबरोबरच त्यांना आठवडाभर विलगीकरणात ठेवण्याबाबत मार्गदर्शनही करण्यात आले.

कोविड -१९ मुळे सध्या महाराष्ट्र राज्य सर्वात जास्त बाधीत झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात कोरोनव्हायरसचे १,२७,४८० सक्रिय रुग्ण आढळले आहेत, तर मध्य प्रदेशात फक्त ४७४० इतकेच रूग्ण आहेत. मध्य प्रदेशातील छिंदवाडा, बालाघाट, बैतूल, सिवनी, खंडवा, बडवानी, खारगोन आणि बुरहानपूर या आठ जिल्ह्यांना महाराष्ट्राची सीमा लागली आहे.

मध्य प्रदेश सरकारने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, महाराष्ट्राच्या सीमेवरील जिल्ह्यांमध्ये तसेच राज्याची राजधानी भोपाळ आणि औद्योगिक केंद्र इंदूरमधील बंद सभागृहात उपस्थितीची क्षमता ५० टक्के मर्यादित असेल.

- Advertisement -

शासनाने लोकांना दोरीच्या सहाय्याने सीमा तयार करून आणि दुकानासमोर गोल रेखाटून सामाजिक सावधानता पाळण्याचे आणि खबरदारीचा उपाय म्हणून सक्तीने मास्क परिधान करण्याचे निर्देश दिले आहे. कोविड -१९ प्रकरणांमध्ये होणारी वाढ रोखण्यासाठी जिल्हा संकट व्यवस्थापन समित्यांनी बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेण्याचे निर्देश दिले.

मध्य प्रदेशात रविवारी कोरोनाव्हायरसच्या ताज्या ७४३ घटना घडल्या असून रूग्णांची संख्या २,६८,५९४ पर्यंत वाढली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार राज्यात कोविड -१९ मुळे ३,८८७ मृत्यूंची नोंद झाली आहे. रविवारी एका दिवसात महाराष्ट्रात कोविड -१९ रूग्णांची संख्या १६,६२० ने वाढली आहे. राज्यातील एकूण प्रकरणे २३,१४,४१३ वर पोचले आहेत.

- Advertisement -