Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रशेतकरी आंदोलनावरुन सयाजी शिदें मोदी सरकारवर संतापले,म्हणाले...

शेतकरी आंदोलनावरुन सयाजी शिदें मोदी सरकारवर संतापले,म्हणाले…

पिंपरी-चिंचवड l केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी मंगळवारी शेतकरी संघटनांना चर्चेचं आवाहन केलं. मात्र, दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी केंद्राला प्रतिसाद दिलेला नाही. केंद्राशी बोलणी करून काही निष्पन्न होत नसल्याचे या नेत्यांचे म्हणणे असून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला. गेल्या २८ दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. मराठी अभिनेते सयाजी शिंदे यांनी आंदोलनावर भाष्य करताना रोखठोक मत माडलं आहे.

सयाजी शिंदे पिंपरी-चिंचवडमध्ये पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेण्यासाठी आले होते. भेटीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांना आंतरराष्ट्रीय शेतकरी दिनाच्या निमित्ताने शेतकरी आंदोलनाबाबत विचारण्यात आलं. यावेळी त्यांनी दाक्षिणत्या चित्रपटातील एक डायलॉग ऐकवा. एक देश मागे गेला म्हणजे या देशातील शेतकरी मागे गेला असं यावेळी ते म्हणाले.

त्यांनी सांगितलं की, “एक देश मागे गेला म्हणजे या देशातील शेतकरी मागे गेला. देश पुढे गेला म्हणजे एक शेतकरी पुढे गेला. ज्याअर्थी आपल्या देशातील शेतकऱ्यांची अशी अवस्था आहे त्याअर्थी देश खूप मागे चालला आहे. आपण सर्वांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. शेतकरी पुढे गेला तरच देश पुढे गेला हे सर्वांनी समजून घेतलं पाहिजे”.

१२ वर्षांपूर्वी महानगरपालिकेकडून एक एकर चाळीस गुंठे जागा निमा या संस्थेने 21वर्षांचा करारनामा करून घेतली होती. गेल्या बारा वर्षात संबंधित ओसाड जागेत निमा संस्थेने वनराई फुलवली असून साडेचारशे वनस्पती लावण्यात आलेल्या आहेत.

मात्र, अचानक सदरची जागा एमआयडीसीने विकल्याचं सांगून काही जण महानगरपालिकडे झाड तोडण्यास सांगत आहेत. मुख्य मुद्दा हा आहे की साडेचारशे झाडांचा बळी चालला आहे. मात्र, तीच झाडं मनुष्य तोडायला निघाला आहे ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. ती झाडं वाचवायची आहेत. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत,” असं सयाजी शिंदे म्हणाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments