Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeपश्चिम महाराष्‍ट्रपुणेदिलासादायक : राज्यातील पहिले कोरोनाग्रस्त दाम्पत्य कोरोनामुक्त!

दिलासादायक : राज्यातील पहिले कोरोनाग्रस्त दाम्पत्य कोरोनामुक्त!

after-second-test-two -coronavirus-patients-found-negative-puneपुणे : कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. मात्र राज्यातील जनतेला दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. राज्यातील पहिले कोरोनाग्रस्त दाम्पत्य अवघ्या 14 दिवसांतच करोनामुक्त झाले आहे. त्यामुळे या दाम्पत्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. अशी माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे. सध्या महाराष्ट्रात 107 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. चार जणांचा बळी गेला आहे.

देशभरात सध्या कोरोनाचे 560 रुग्ण असून 11 जणांचा बळी गेला आहे. पुण्यात कोरोनाग्रस्त दाम्पत्य दुबईहून आले होते. त्यांची तपासणी केली असता त्यांना करोना झाल्याचं आढळून आलं होतं. त्यानंतर त्यांना 9 मार्च रोजी नायडू रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. त्यांना विलगीकरण कक्षातही ठेवण्यात आले होते. मात्र गेल्या 24 तासात त्यांची दोनदा तपासणी करण्यात आली असता त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. त्यामुळे डॉक्टरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून या दाम्पत्याला डिस्चार्ज दिला आहे. डिस्चार्ज झाल्यानंतर या दाम्पत्याचा रुग्णालय प्रशासनाकडून सत्कार करण्यात आला.

या दाम्पत्याचा आजार बरा झाल्याने करोना बरा होऊ शकतो हेच यातून दिसून आले आहे. त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये, मात्र गर्दीत जाऊ नये आणि सोशल डिस्टंसिंग पाळावी, असं डॉक्टरांनी म्हटलं आहे. दरम्यान, 10 मार्च रोजी तीन रुग्ण नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचे पहिले रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. दुसरे रिपोर्ट आज रात्रीपर्यंत येईल. त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास त्यांनाही डिस्चार्ज दिला जाणार असून करोनामुळे बरे होणाऱ्यांची संख्या पाच होणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments