Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रशपथविधी सोहळ्यानंतर पहिली कॅबिनेट बैठक रात्री होणार

शपथविधी सोहळ्यानंतर पहिली कॅबिनेट बैठक रात्री होणार

 After swearing in ceremony  Mahavikasaghadi will hold first cabinet meeting at Sahyadri मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे हे आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. संध्याकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी शिवाजी पार्कवर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची कॅबिनेटची पहिली बैठक रात्री होणार आहे.

महाराष्ट्र विकास आघाडीने किमान समान कार्यक्रम जाहीर केलं असून, त्या दृष्टीकोनातून काम करणार असल्याची माहिती विधीमंडळाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे विधीमंडळाचे नेते एकनाथ शिंदे, काँग्रेस विधीमंडळाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आज गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितलं.

किमान समान कार्यक्रमामध्ये शेतकरी, अंगणवाडी सेविका, शासकीय नोकरभरती , बचत गट, आरोग्य, शिक्षण यासह इतर मुद्यांवर महाराष्ट्र विकास आघाडीने कार्यक्रम आखला आहे. राज्याच्या विकासासाठी आम्ही काम करणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे, काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. २० वर्षांनंतर महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान होणार आहे. तसंच उद्धव ठाकरे हे राज्याचे २९ वे मुख्यमंत्री असतील. त्यांच्या शपथविधीचा ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments