अखेर मंत्रालयावरील त्या तरुणाला पोलिसांनी २ तासानंतर घेतले ताब्यात!

- Advertisement -

मुंबई : मुंबईत मंत्रालयाच्या सातव्या मजल्याच्या सज्जावर दोन तासापासून चढलेल्या तरुणाला पोलिसांनी अखेर ताब्यात घेतले. ज्ञानेश्वर साळवे असे हायहोल्टेज ड्रामा करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांना भेटण्याची इच्छा व्यक्त करुन तो तरुण मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरील सज्जावर चढला होता. तरुणाने त्याचा मोबाइल नंबर एका कागदावर लिहून खाली पोलिसांकडे फेकला होता. त्यानंतर त्याच्याशी संवाद साधण्यात आले मात्र तो ऐकण्यणच्या मनस्थितीत नव्हता. अग्निशमन दलाला येथे प्राचरण करण्यात आले होते. तरुण उडी मारुन आत्महत्या करेल अशी भिती व्यक्त करण्यात येत होती. हा तरुण मागणी करत आहे. तरुणाच्या या प्रकारामुळे मंत्रालयात एकच खळबळ उडाली आहे.मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरील सज्जावर तरुण पोहोचला कसा, हा प्रश्नही उपस्थित होतं.

- Advertisement -