Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रविद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीत अभाविपचा अर्ज बाद

विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीत अभाविपचा अर्ज बाद

मुंबई – मुंबई विद्यापीठातील विद्यार्थी परिषदेच्या सचिव पदासाठीच्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा अर्ज बाद झाल्याने या निवडणुकीत युवा सेनेच्या उमेदवाराची बिनविरोध निवड होणार आहे. याबाबत येत्या ७ फेब्रुवारी रोजी औपचारिक घोषणा करण्यात येणार आहे.

राज्यात आणि विषेशतः कोकणात अभाविपची ताकद असताना एक योग्य उमेदवार अभाविपला देता आला नाही, त्यासाठी भाजपच्या काही नेते आणि आमदारांनी धावपळ करूनही यश आले नसल्याने अभाविपच्या कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
अभाविपच्यावतीने पुनम शिंदे आणि युवा सेनेच्यावतीने ओमकार भोपी यांनी अर्ज भरला होता. अभाविपच्या उमेदवार पूनम शिंदे यांच्या अर्जावर जन्मतारखेचा उल्लेख नसल्याने आणि सुचक-अनुमोदक यांची खोटी सही असल्याच्या आक्षेपमुळे परीक्षकांनी त्यांचा अर्ज पहिल्या तपासणी फेरीतच बाद केला.
अभाविपने खालच्या थराला जाऊन त्यांच्या उमेदवाराच्या अर्जावर सूचक आणि अनुमोदक यांच्या बोगस सह्या घेतल्या. ही घटना शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी आणि निंदनीय असल्याचे युवासेनेचे उमेदवार ओमकार भोपी यांनी यावेळी सांगितले. अभाविपच्या उमेदवाराचा अर्ज छाननी प्रक्रियेत पहिल्याच फेरीत बाद झाल्याने अभविपचा खोटारडेपणा समोर आल्याचा आरोप युवा सेनेकडून करण्यात आला आहे. अभाविपचा अर्ज बाद झाल्याने युवा सेनेत जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे, तर अभाविपमध्ये नाराजी पसरली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments