होम महाराष्ट्र कृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…

कृषीमंत्री ‘पांडुरंग फुंडकर’ यांचं हृद्य विकाराच्या झटक्याने दु:खद निधन…

239
0
शेयर

महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच हृद्य विकाराच्या तीव्र झटक्याने पहाटे निधन झाल. ‘पांडुरंग फुंटकर’ यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना तातडीने पहाटे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र हृद्यविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

फुंडकरांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. महाराष्ट्रात भाजपचे अस्तित्व वाढवण्यामध्ये ‘फुंडकर’ यांनी मोठी भूमिका पार पाडली होती. गोपीनाथ मुंडेंसोबत त्यांनीही महाराष्ट्रात भाजपचा प्रचार मोठ्या प्रमाणात केला. कृषी प्रश्नांची जाण असणारा नेता म्हणून महाराष्ट्रात त्यांची एक वेगळीचं ओळख होती.