Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रमी हातात बांगड्या भरल्या नाहीत, आरेला कारेने उत्तर देतो : अजित पवार

मी हातात बांगड्या भरल्या नाहीत, आरेला कारेने उत्तर देतो : अजित पवार

Ajit Pawar criticizes ram Shinde, Guardian Minister of Ahmednagar
मी हातात बांगड्या भरलेल्या नाहीत. ‘मी आरे ला कारे म्हणणारा माणूस आहे. जर कोणी दम दिला तर त्याला आणि त्याच्या खानदानाला बघतो’ अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांचा नाव न घेता शरसंधान साधले.

अजित पवार अहमदनगरमधील जामखेड तालुक्यात खर्डा येथे राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते. ‘काही जण मला सांगतात कर्जत जामखेडच्या परिसरात काही गटामध्ये काही दबाव आहे, काही दहशत आहे. आम्ही काय असं-तसं इथे आलोय काय? जे अशा प्रकारची दादागिरी, गुंडगिरी करतील, ज्या गावच्या बोरी असतात, त्याच गावच्या बाभळी असतात. हे त्यांनी विसरु नये. आम्ही काय बांगड्या घातल्या नाहीत’, अशा शब्दात अजित पवार यांनी इशारा दिला.

कर्जत जामखेड मतदारसंघात अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार विरुद्ध भाजप मंत्री राम शिंदे अशी लढत होत आहे. ‘आमच्या कार्यकर्त्यांच्या केसाला कोणी धक्का लावला, तर त्यांच्याकडे बघून घेईन. मी लोकशाही मानणारा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान मानणारा आहे. मी घटना-कायदा मानणारा आहे. आमचे कार्यकर्ते जर नीट आचारसंहितेचं पालन करत असतील आणि कोण बाहेरचे आणले, तर मलाही जशास तसं उत्तर देता येतं.’ असं अजित पवार यांनी ठणकावून सांगितलं. यामुळे सध्यातरी प्रचाराला चांगलाच जोर वाढला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments