Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रएक हात मदतीचा’ उपक्रम : पूरग्रस्तांसाठी युवा नेते श्री अरविंद भाऊ पाटील...

एक हात मदतीचा’ उपक्रम : पूरग्रस्तांसाठी युवा नेते श्री अरविंद भाऊ पाटील निंलगेकर

akka foundation kolhapur,akka,foundation,kolhapur floods,sangli,solapur,floods,kolhapurपश्चिम महाराष्ट्रात पावसाने थैमान घातल्याने कोल्हापूर, सांगली, कराड आदी भागांत प्रचंड पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. हजारो नागरिक बेघर झाले आहेत. अशा आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत हवी आहे यासाठी  अरविंद पाटील यांच्या  पुढाकाराने ‘एक हात मदतीचा’ हा उपक्रम हाती घेतला आहे. पूरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तुंची मदत करण्यात येईल.

आठ दिवसांपासून पावसाने पश्चिम महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील नागरिकांचे दैनंदीन जीवन विस्कळीत झाले आहे. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी लोकांना संघर्ष करावा लागत आहे. आजही परिस्थिती हाताबाहेर गेलेली असल्यामुळे शासकीय यंत्रणा अपुरी ठरत आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्याचे प्रशासनाकडून काम सुरू आहे. जे पुरातून सुरक्षितपणे बाहेर आले आहेत त्यांना जीवनावश्यक वस्तुंची गरज भासत आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून  नागरिकांना जीवनाश्यक वस्तुंची, औषधे, पिण्याचे पाणी, कपडे आदी वस्तुंची जुळवाजुळव केली आहे.

akka foundation,akka,kolhapur,kolhapur floods,helping hands

नागरिकांना मदतीसाठी आवाहन…

कोल्हापुर, सांगली, सातारा, लोकांना कशी मदत करावी याची चिंता आहे. अशा नागरिकांनी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. तसेच सामाजिक बांधिलकीतून मदत देण्यासाठी अक्का फांऊडेशनचे समन्वयक

रामलिंग शेरे मो ९८५०५७४२५४,

तानाजी बिरादार ९६२३६७९८१७,

अमोल पाटील ८८६१०८०९७५,

श्री आनंद अट्टल  ९२७२९९०९९९.

यांच्याशी संपर्क साधावा तसेच, आर्थिक स्वरुपात मदत स्वीकारली जाणार नाही. आर्थिक मदत करायची असेल तर मुख्यमंत्री सहाय्यता निधी येथे करावी असे आवाहन नागरिकांना केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments