एक एसी लोकल आणली,पण १२ साध्या लोकल फेऱ्याला ब्रेक लावला!

- Advertisement -

मुंबईमुंबईकरांसाठी मोठा गाजावाजा करुन थंडीत एक एसी लोकल सुरु करण्यात आली. या बदल्यात साध्या लोकलच्या बारा फेऱ्या रद्द केल्या. रेल्वेच्या या धोरणामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत असून प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.

वातानुकूलित लोकलचे भाडे प्रत्येक प्रवाशाला परवडणारे नाही. ६० ते २०० रूपये इतके या लोकलचे भाडे  तर सामान्य लोकले भाडे १०-३० रूपये इतके आहे.  त्यामुळे सध्याच्या लोकल फेऱ्या रद्द करून पश्चिम रेल्वेने काय साधले, असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे. २५ डिसेंबर ते २९ डिसेंबपर्यंत वातानुकूलित लोकलच्या प्रत्येक दिवशी सहा फेऱ्या होणार आहेत. तर १ जानेवारीपासून १२ फेऱ्या होतील. त्यामुळे या वाढीव फेऱ्यांचा अजून किती साध्या लोकल्सवर परिणाम होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

लोकल ही मुंबईकरांची लाईफलाईन आहे. नवीन आधुनिक तंत्रज्ञान आणताना पायाभूत सुविधांचा आणि प्रवाशांच्या सोयीचा विचार करणं गरजेचं असतं. त्यामुळे  आता प्रवाशांची गैरसोय सरकार दुर करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सकाळी १० वाजून २१ मिनिटांनी बोरिवली स्थानकातून या प्रवासाला सुरुवात झाली. शिक्षणमंत्री विनोद तावडे, खासदार किरीट सोमैया, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्घाटनाला हजेरी लावली होती.

- Advertisement -
- Advertisement -