Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रअंधेरीतील मित्तल इस्टेटच्या आगीत होरपळून एकाचा मृत्यू

अंधेरीतील मित्तल इस्टेटच्या आगीत होरपळून एकाचा मृत्यू

मुंबई: मुंबईतील अंधेरी येथील प्रिंटीग प्रेसमध्ये गुरुवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीत होरपळून एकाचा मृत्यू झाला आहे. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. प्रदीप विश्वकर्मा असे या आगीत मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

अंधेरीतील मित्तल इस्टेट येथे एक प्रिटींग प्रेस असून या प्रेसमध्ये गुरुवारी पहाटे अडीचच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. तर बाकीच्या कर्मचाऱ्यांनी बाहेर पळ काढल्याने ते बचावले. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे ४ बंब आणि ४ वॉटर टँकर्सनी घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. दुसरीकडे औरंगाबादमधील एका प्लास्टिक कंपनीतही आग लागल्याचे वृत्त आहे. या घटनांमुळे कंपन्यांमध्ये सुरक्षेकडे होणारे दुर्लक्ष पुन्हा एकदा समोर आले आहे.

दरम्यान, डिसेंबरमध्ये मुंबईतील लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊंड येथे पबमध्ये आग लागली होती. मोजो ब्रिस्ट्रो आणि १ अबव्ह या दोन रेस्तराँना आग लागली होती. या आगीत १४ जणांचा बळी गेला होता. यानंतर कांजुरमार्ग येथील सिनेव्हिस्टा स्टुडिओत लागलेल्या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाला होता. तर १८ डिसेंबर रोजी साकीनाका भानू फरसाण मार्टमध्ये लागलेल्या आगीत १४ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments