Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रपरभणीच्या जिंतूरमध्ये अंगणवाडी सेविकेची आत्महत्या

परभणीच्या जिंतूरमध्ये अंगणवाडी सेविकेची आत्महत्या

परभणी : परभणी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली.  जिंतूर तालुक्यात एका अंगणवाडी सेविकेने आत्महत्या केली. बोर्डी गावातल्या सुमित्रा राखुंडे असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. अंगणवाडी सेविकांचे नुकतेच पगारीसाठी आंदोलन झाले. ही घटनाताजी असतांना सेविकेने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

गळफास लावून त्यांनी आपलं जीवन संपवलं. टोकाचं पाऊल उचलण्याआधी त्यांनी एक ह्रदयद्रावक पत्र लिहून ठेवलं. ‘ मी ५ वर्षं मंदिरात अंगणवाडी चालवली, पण सरकार रजिस्टर मागतं. मी रजिस्टर कुठून आणू? ५ महिन्यांपासून मला पगार नाही. झेरॉक्ससाठी माझ्याकडे पैसे नाहीत, मी आत्महत्या करत आहे’, असं त्यांनी लिहून ठेवलं.अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाचाही उल्लेख त्यांनी या पत्रात केलाय.

अंगणवाडी सेविकेचं हृदयद्रावक पत्र

तुम्ही खूप मोर्चे काढले. अंगणवाडीसाठी मदतनीस म्हणून मी दिवसरात्र कष्ट केले. पण आज मला काही सूचत नाहीये. २००८ पासूनचं रजिस्टर कुठून द्यायचं? मी मंदिरात अंगणवाडी भरवली. सरकारनं कौतुक केलं पाहिजे. ही महिला नाजूक असूनपण मंदिरात अंगणवाडी भरवली. ५ वर्षं अंगणवाडी कशी चालवली असेल याच्याशी सरकारला काहीही देणंघेणं नाही. कधीपण हा विचार करत नाही की अंगणवाडी रजिस्टर कुठे ठेवायचं. ५ वर्षं म्हणून माझ्याकडे रजिस्टर नव्हते. आमच्या मॅडम अंगणवाडीत येणार आहेत. २००८ चं रजिस्टर कुठून द्यायचं ? म्हणून मी आत्महत्या करत आहे. ५ महिन्यांपासून पगार नाही. झेरॉक्स कुठून आणायचे ? रजिस्टरसाठी १००० रुपये लागतात. माझ्याकडे एकही रुपया नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments