डेलकरांच्या सुसाईड नोटमध्ये ज्यांची नावे आहेत त्यांना अटक करा;शिवसेनेचा हल्लाबोल

- Advertisement -
anil-parab-reply-to-Devendra-fadnavis-on-mansukh-hiren-death-case-demand-investigate-mohan-delkar-case
anil-parab-reply-to-Devendra-fadnavis-on-mansukh-hiren-death-case-demand-investigate-mohan-delkar-case

मुंबई : मनसुख हिरेन प्रकरणी विधिमंडळात प्रचंड गदारोळ आज पाहायला मिळाला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप करीत त्यांच्या अटकेची मागणी केली.

फडणवीस यांच्या आरोपांना मंत्री अनिल परब यांनी उत्तर देताना, ‘खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येचीही चौकशी करण्याचे  मागणी केली. डेलकरांच्या सुसाईड नोटमध्ये ज्यांची नावे आहेत. त्यांना देखील अटक झालीच पाहिजे’, अशीही मागणी परब यांनी केली.

‘भाजप खासदार मोहन डेलकर यांच्या सुसाईड नोटमध्ये प्रशासकाचे नाव आहे. प्रशासक कोणत्याही पक्षाचे नसतात. त्यामुळे डेलकऱ्यांच्या आत्महत्येची ढाल पुढे करून सरकार मनसुख हिरेन प्रकरणी सचिन वाझेंना प्रयत्न करीत असल्याचा’, आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

- Advertisement -

डेलकर प्रकरणावरून फडणवीस आणि अनिल परब यांच्यात जुंपली होती. तुम्ही जबाब वाचून जर वाझेंच्या अटकेची मागणी करत असाल तर त्याच न्यायाने डेलकर यांच्या सुसाईड नोटमध्ये ज्या लोकांची नावं आहेत, त्यांना अटक केली पाहिजे, अशी मागणी परब यांनी लावून धरत विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न केला.

डेलकर यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारे प्रफुल्ल खेडा पटेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकेकाळी सहकारी होते, असा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे.

अनिल देशमुख यांनी मोहन डेलकर प्रकरणी विधानसभेत निवेदन सादर केलं.

डेलकर यांनी सुसाईड नोट लिहिली आहे. त्यात त्यांनी एका नावाचा उल्लेख केला आहे. दादरा-नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल यांचा उल्लेख आहे. पटेल यांच्यासह काही अधिकाऱ्यांच्या दबावाखाली मला त्रास देण्यात आला. मला अडचणी येत होत्या. पटेल यांच्या माध्यमातून मला सामाजिक जीवनातून उद्ध्वस्त करण्याच्या धमक्या देण्यात येत होत्या. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे, असं डेलकर यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे, असं देशमुख यांनी सांगितलं.

पटेल होते गुजरातचे माजी गृहमंत्री

प्रफुल्ल खेडा पटेल हे सध्या दादरा-नगर हवेलीमध्ये प्रशासक म्हणून कार्यरत आहेत. ते आधी गुजरातचे गृहमंत्री होते. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असावेत तेव्हा पटेल हे गुजरातचे गृहमंत्री असावेत असा माझा कयास आहे. त्यानंतर पटेल यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. तेव्हा सभागृहात एकच गदारोळ झाला.

महाराष्ट्रावर विश्वास असल्याचे डेलकरांचे मत

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र सरकारवर माझा विश्वास आहे. त्यामुळेच मी आत्महत्या करत आहे. मला महाराष्ट्रातच न्याय मिळेल, असंही डेलकर यांनी सुसाईडनोटमध्ये म्हटलं आहे, असं त्यांनी सांगितलं.

एसआयटीमार्फत चौकशी होणार 

डेलकर याच्या आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा म्हणून डेलकर आत्महत्या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येत असल्याचं देशमुख यांनी जाहीर केलं.

- Advertisement -