Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रनाराज एकनाथ खडसे पंकजा मुंडेंच्या भेटीसाठी रॉयलस्टोनमध्ये

नाराज एकनाथ खडसे पंकजा मुंडेंच्या भेटीसाठी रॉयलस्टोनमध्ये

Pankaja Munde , Eknath Khadseमुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे पक्षात नाराज आहेत. खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची सोमवारी दिल्लीत भेट घेतली. खडसे मंगळवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची भेट घेणार आहेत  त्यापूर्वी खडसे माजी मंत्री पंकजा मुंडेंची भेट घेण्यासाठी त्यांच्या रॉयलस्टोन या निवासस्थानासाठी पोहोचले आहेत. त्यामुळे भाजपात भूकंप होण्याची शक्यता आहे. खडसे काय निर्णय घेतात त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
माजी  मंत्री पंकजा मुंडे या सुध्दा पक्षावर नाराज आहेत. भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना संपवण्याचं काम सुरु आहे. पक्षातच त्यांच्याविरोधात षडयंत्र रचलं जात आहे. त्यामुळे त्या पराभवानंतर पक्षावर नाराज आहेत. 12 डिसेंबरला गोपीनाथ गडावर काय निर्णय घेतात त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपात ओबीसी नेते नाराज आहेत. त्याचा मोठा फटका भाजपला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
खडसेंच्या कन्या अ‍ॅड. रोहिणी खडसेंचा पराभव झाल्यानंतर खडसे संतप्त झाले आहेत. खडसेंना पक्षाने तिकीट न देता बाजूला केले, त्यानंतर मुलीला तिकीट दिले. भाजपच्या मंडळींनी विरोधात काम केले. असा आरोप खडसेंनी केला आहे. त्याचे पुरावे पक्षश्रेष्ठीला दिले आहेत असे खडसेंनी जाहीरपणे सांगितले. खडसे कालच म्हणाले की, मला पक्षाच्या सुकाणू समितीवरून काढण्यात आले. जाणीवपूर्वक पक्षातून दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तरीही मी यांची आरती करावी काय? माझा पक्ष सोडण्याचा अद्यापही विचार नाही. परंतु वारंवार असाच अन्याय होत राहिल्यास मला पक्षाबाबत वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा खडसे यांनी दिला.

खडसे म्हणाले, की पक्ष उभारणीसाठी मी मेहनत घेतली. परंतु त्याच पक्षाने मला फळ काय दिले? मला पक्षात बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. वेगवेगळ्या चौकशीचे आदेश दिले, कोणतेही कारण नसताना पक्षाने माझ्यावर कारवाई का केली? मात्र अशी कारवाई माझ्यावरच नव्हे तर अगोदर गोपीनाथ मुंडे यांच्यावरही करण्यात आली होती. मला स्पर्धेतून बाहेर करण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे पक्षातील अशा लोकांची मी आरती करावी काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगर मतदारसंघात अ‍ॅड. रोहिणी खडसे यांना पराभूत करण्यात आल्याच्या आरोपाबाबत खडसे म्हणाले, याबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे नावानिशी पुरावे, ध्वनिफिती दिल्या आहेत. आपण त्यांना हे पुरावे, नावे माध्यमांसमोर जाहीर करण्याची परवानगी मागितली होती, मात्र ती त्यांनी दिलेली नाही. खडसे पक्षामध्ये नाराज असल्यामुळे ते वेगळी भूमिका घेऊ शकतात अशी चिन्हे आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments