Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeदेशनीरव मोदीचा १३०० कोटींचा आणखी एक घोटाळा!

नीरव मोदीचा १३०० कोटींचा आणखी एक घोटाळा!

नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) हिऱ्याचा व्यापारी नीरव मोदीचा १३२२ कोटींचा आणखी एक घोटाळा उघडकीस आणला आहे. पीएनबीने सोमवारी रात्री उशिरा स्टॉक एक्सचेंजला नीरव मोदी आणि त्याचा व्यावसायिक भागीदार मेहुल चोक्सी यांनी २०४ मिलियन डॉलर म्हणजे १३२२ कोटी रूपयांचा आणखी एक घोटाळा केल्याची माहिती दिली. या नव्या घोटाळ्यामुळे नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सीचा घोटाळा हा २० हजार कोटी पेक्षा जास्त झाला आहे.

यापूर्वी पीएनबीने नीरव मोदीवर ११४०० कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. नीरव मोदीने केलेल्या या अवैध व्यवहाराचे मूल्य हे पीएनबीच्या वर्ष २०१७ च्या एकूण फायद्याएवढे आहे. वर्ष २०१७मध्ये सार्वजनिक क्षेत्रात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पीएनबीला १३२० कोटी रूपयांचा फायदा झाला होता. बँकेच्या ओव्हरसीज शाखेला मिळालेल्या नव्या लेटर ऑफ अंडरटेकिंग्जनंतर हा नवा घोटाळा समोर आला.

नीरव मोदीच्या अवैध व्यवहाराचा आकडा २०४ मिलियन डॉलर म्हणजेच १२६०० कोटी रूपयांपर्यंत पोहोचला आहे, असे पीएनबीने आपल्या फायलिंगमध्ये स्टॉक एक्सचेंजला कळवले. अजून काही घोटाळे बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments